शिक्रापूरच्या आदर्श महिला ग्राम महसुल आधिकारी सुशीला गायकवाड ग्रामसमृद्धी पुरस्काराने सन्मानित

शिरूर : शिक्रापूर ता. शिरूर येथिल महीला ग्राम महसुल आधिकारी ( तलाठी )सुशिला गायकवाड यांना नालंदा ऑर्गनायजेशन संस्था यांच्या वतीने पत्रकार भवन, पुणे येथे ग्रामसमृद्धी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यामध्ये ग्रामीण पातळीवरील प्रेरणादायी कामामुळे त्यांना आदर्श ग्राम महसुल आधिकारी (तलाठी )म्हणुण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
ग्रामीण शेतकऱ्यांसाठी ही संस्था काम करते. गायकवाड यांनी शिक्रापूर,पिंपरी दुमाला, पुणे शहर, भुसंपादण विभागात तलाठी म्हणुण अतिशय उत्कृष्ठ काम केले आहे.
प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्र अतिशय सुंदररीत्या सजावट करून मतदारांना व तेथील कर्मचाऱ्यांना चांगल्या सोईसुविधा पुरवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याने महसुल विभाग, व परीसरातील नागरीकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.





