Village Development Officer: जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवकांचा मोर्चा
Village Development Officer:

ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा मोर्चा
ग्रामसेवक मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
Village Development Officer: शिवरे येथील घटनेमध्ये ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, वर्षांतून एकच ग्रामसभा घेण्यात यावी, संवेदनशील ग्रामपंचायतींच्या बैठकींसाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये नियमित ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासाने त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
यामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात भीती, असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकार्यांनी दि. १८ऑगस्टपासून ग्रामसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून, मागण्या मान्य होईपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.



