विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार?

The Sabarmati Report | बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित असून समीक्षकांनीही कौतुक केले होते. तर काहींनी या चित्रपटावर टीका देखील केली. या चित्रपटाची कथा गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर आधारलेली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्यावर अनेकांकडून टीका झाली.
या चित्रपटात विक्रांत मेस्सीने समर कुमार हे पात्र साकारलेले आहे. चित्रपटागृहानंतर आता हा चित्रपट OTT वर पाहण्याची पाहता येणार आहे. या चित्रटाचे डिजिटल अधिकार ZEE5 ने विकत घेतले आहेत आणि चित्रपट जानेवारी 2025 मध्ये ZEE5 वर OTT वर प्रदर्शित होईल. धीरज सरना दिग्दर्शित हा चित्रपट 10 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म झी-5 वर प्रदर्शित होणार आहे. The Sabarmati Report |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाहिला चित्रपट
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. केंद्रीय मंत्र्यांसाठी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी नेते उपस्थित होते.
या चित्रपटात विक्रांत मेसी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा, सुदीप वेद, हेला स्टिचल्मेयर, दिग्विजय पुरोहित, अभिशांत राणा, उर्वशी गोल्टर यांच्यासह इतरही दिग्गज कलाकार आहेत. एकता कपूर, शोभा कपूर, अंशुल मोहन आणि अमूल वी मोहन यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तर चित्रपटाची कथा अर्जुन भांडेगांवकर, धीरज सरना, विपिन अग्निहोत्री आणि अविनाश सिंह तोमर यांनी लिहिली आहे. The Sabarmati Report |
हेही वाचा :





