विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम; का घेतला अभिनेत्याने असा निर्णय?

Vikrant Massey Retirement | अभिनेता विक्रांत मेस्सीने टीव्ही मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत मोठे नाव कमवले आहे. मात्र आता विक्रांतने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. विक्रांतने अभिनय क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
विक्रांतने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “हॅलो, गेली काही वर्षे खूप चांगली गेली. तुमच्या अद्भुत पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. पण जसजसा मी पुढे जात आहे तसतसे मला हे समजले आहे की, माझ्यासाठी स्वतःला एकत्र खेचून घरी परतण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा आणि अभिनेता म्हणूनही….”
विक्रांतने पुढे लिहिले, “येत्या 2025 मध्ये, योग्य वेळ येईपर्यंत आम्ही एकमेकांना शेवटच्या वेळी भेटू. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. सर्व काही आणि दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन.” सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
View this post on Instagram
विक्रांत मॅसीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २००४ मध्ये ‘कहां हूँ मैं’ या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने ‘धरमवीर’, ‘बालिका वधू’ आणि ‘कुबूल है’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्येही काम केले. त्याने २०१३ मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या सिनेमात त्याने देवदास मुखर्जीची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी रिलीज झालेला ’12वी फेल’ हा त्याच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
नुकताच प्रदर्शित झालेल्य ‘द साबरमती रिपोर्ट’ला देखील चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक असलेल्या गोध्रा घटनेवर आधारित या चित्रपटाचे राजकीय वर्तुळात खूप कौतुक झाले. यानंतर आता ‘आंखों की गुस्ताखियां’ आणि ‘झिरो से रीस्टार्ट’ हे त्याचे शेवटचे दोन चित्रपट पुढील वर्षी रिलीज होऊ शकतात.
हेही वाचा:
उत्तर भारतातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच ; ‘या’ 5 मागण्यांसाठी काढला मोर्चा





