Vikram Kakade Net Worth : विक्रम काकडे यांची संपत्ती किती ? जय पवारांना दिलेय ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; प्रतिज्ञापत्रातून खुलासा
Vikram Kakade Net Worth : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी निवडणूक लढविणारे विक्रम काकडे हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. भाजपप्रणीत महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत.

Vikram Kakade Net Worth : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार विक्रम काकडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. तसेच काकडे कुटुंबाची एकूण मालमत्ता १५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी निवडणूक लढविणारे विक्रम काकडे हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. भाजपप्रणीत महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज भारण्याच्या दिवशीच विक्रम काकडे आणि त्यांचे वडील, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी सुनेत्रा पवार तसेच जय आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Vikram Kakade Net Worth)
३३ वर्षीय विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी विविध व्यक्ती, कंपन्या आणि संस्थांना एकूण ४१.८० कोटी रुपयांची कर्जे व आगाऊ रक्कम दिली आहे. यामध्ये जय अजित पवार यांना दिलेल्या १० कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. याशिवाय रुस्तम भरुचा यांना ४.९४ कोटी रुपये, परवेझ केकी ग्रँट यांना २.१७ कोटी रुपये आणि श्रीशा एंटरप्रायझेसला ७.५५ कोटी रुपये आगाऊ रक्कम दिल्याची नोंद आहे. (Vikram Kakade Net Worth)
विक्रम काकडे यांची जंगम मालमत्ता ७८.९५ कोटी रुपये – (Vikram Kakade Net Worth)
प्रतिज्ञापत्रानुसार, विक्रम काकडे यांची जंगम मालमत्ता ७८.९५ कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये ७.५ लाख रुपये रोख रक्कम, बँक ठेवींमध्ये २९.५३ लाख रुपये तसेच बाँड्स, शेअर्स, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंडांमधील ११.६९ कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे. विमा पॉलिसी आणि इतर आर्थिक साधनांमध्ये त्यांनी ३०.१६ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
22 कोटींची वाहने – (Vikram Kakade Net Worth)
काकडे यांच्या मालकीच्या आलिशान वाहनांच्या ताफ्याची किंमत २२.०४ कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या ताफ्यात बीएमडब्ल्यू ७४०आय, बीएमडब्ल्यू जी३१०आर, लेक्सस एलएम ३५०एच, टोयोटा लँड क्रूझर, टोयोटा फॉर्च्युनर, इसुझू व्ही-क्रॉस, मिनी कूपर एस, मर्सिडीज-बेंझ जीएलसी ३०० आणि लॅम्बोर्गिनी हुराकॅन यांसारख्या महागड्या वाहनांचा समावेश आहे.
तसेच सोने, चांदी, मौल्यवान दागिने आणि घड्याळांसह २.२५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची नोंद करण्यात आली आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ७४.०७ कोटी रुपयांची असून पुण्यातील बिगरशेती भूखंड, पाषाण येथील निवासी मालमत्ता आणि दुबईतील मालमत्तेचा त्यात समावेश आहे. विक्रम काकडे यांच्या पत्नी देविका काकडे यांच्या नावावर ९.१९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
विक्रम काकडे 12वी पास – (Vikram Kakade Net Worth)
शैक्षणिक पात्रतेबाबत विक्रम काकडे यांनी बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) उत्तीर्ण असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये पुण्यातील महाविद्यालयातून ७०.८३ टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधानपरिषद जागांसाठी तसेच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एका पोटनिवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे या निवडणुकांतील मतदार असणार आहेत.





