#AsianOlympicQualifires : विकास कृष्णनने मिळवला ऑलिम्पिक कोटा

अमान (जाॅर्डन) – भारताचा अव्वल मुष्टियोध्दा विकास कृष्णन याने रविवारी 69 किलो वजनी गटात आशियाई आॅलिम्पिक पात्रता मुष्टियुध्द स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. यासह त्याने टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.
विकास कृष्णन याने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा मुष्टियोध्दा सेवोन ओकाजवा याचा 5-0 ने पराभव करत विजय मिळविला. या विजयासह त्याने उपांत्यफेरीत आगेकूच केली असून तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.
Vikas Krishan qualifies for Tokyo!#TOPSAthlete @officialvkyadav reaches his 3rd Olympics after beating Japan’s Sewonrets Okazawa 5-0 in the men’s 69 kg quarterfinals at the Asia-Oceania Olympic Boxing Qualifiers.@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice @BFI_official @PMOIndia pic.twitter.com/h7RiKEXCak
— SAIMedia (@Media_SAI) March 8, 2020
दरम्यान, याआधीच्या सामन्यात त्याने कर्गिस्तानच्या नूरू सुल्तान ममातोली यांची 5-0 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.





