विकास दुबे चकमक खोटी नाही; यूपी पोलिसांचा दावा

नवी दिल्ली: विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांची चकमक खोटी नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. पोलिस चकमकीत गुंड विकास दुबे आणि त्याच्या पाच साथीदारांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात खंडपीठामार्फत सुनावणी होईल.
मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वात ही सुनावणी होईल. घनश्याम उपाध्याय आणि अनूप प्रकाश अवस्थी या दोन वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर न्यायालय सुनावणी सुरु आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या चकमकिची सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणार्या याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान, दुबे आणि साथीदारांच्या चकमकी संदर्भात रिपोर्ट दाखल करणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने कोर्टाला सांगितले.
सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांचे खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करत होते. चकमकीत विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या हत्येची आणि आठ पोलिस कर्मचार्यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पॅनेल गठित करण्यावर विचार करता येईल, असे कोर्टाने म्हटले होते. त्याचबरोबर कोर्टाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी 20 जुलैची तारीख निश्चित केली.
Uttar Pradesh Police filed its detailed reply before the Supreme Court in connection with the deaths of Vikas Dubey and his associates, stating that the “encounters” were correct and can’t be termed fake. pic.twitter.com/tWjnmboYHZ
— ANI (@ANI) July 17, 2020





