K. Annamalai : अण्णामलाईंच्या रडारवर विजय यांचे सरकार; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याचे संकेत
के.अण्णामलाई यांच्या रडारवर मुख्यमंत्री विजय यांचे सरकार आले आहे. अण्णामलाई यांनी केलेल्या एका दाव्यामुळे ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विजय सरकारला घेरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

K. Annamalai – तमिळनाडूतील फायरब्रँड नेते के.अण्णामलाई यांच्या रडारवर मुख्यमंत्री विजय यांचे सरकार आले आहे. अण्णामलाई यांनी केलेल्या एका दाव्यामुळे ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विजय सरकारला घेरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री विजय यांचा स्वत:चा भ्रष्टाचाराला विरोध आहे. तसे दिसूनही येत आहे. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सरकारी कंत्राटांच्या बदल्यात लाचेची मागणी करू लागले आहेत.
मतांसाठी आम्ही पैसे दिले. त्यामुळे आम्हाला काही टक्के कमिशन मिळायला हवे अशी मागणी काही मंत्री करत आहेत. तशा प्रकारच्या संभाषणांचे पुरावे माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
भ्रष्टाचाराचा मुद्दा चिघळण्याआधी विजय यांनी संबंधित मंत्र्यांना लगाम घालावा, असे अण्णामलाई एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. विजय यांचे सरकार नवे आहे. त्यामुळे मी ते अस्थिर करू इच्छित नाही.
सरकारला मी आणखी काही वेळ देईन, अशी सबुरीची भाषाही त्यांनी बोलून दाखवली. भाजपला रामराम ठोकून अण्णामलाई यांनी वुई द लिडर्स नावाची चळवळ सुरू केली आहे. त्या चळवळीला भविष्यात राजकीय पक्षाचे स्वरूप देण्याचा त्यांचा इरादा आहे.





