farmers news : “सरकारकडून पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर”; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar – गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती शेअर केली आहे. जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
सरकार आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी पण खायला कमी? जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याची घटना पुढे आली आहे.
सरकार आणि प्रशासनात पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर कसा होत आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्ट्राचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा ही आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहे.





