Vijay Wadettiwar : “महाराष्ट्रात ओला दुुष्काळ जाहीर करा” – विजय वडेट्टीवार
Updated On:

मुंबई – राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाल्याने नुकसानीचे पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतक-यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. तसेच बँकेकडून शेतक-यांची होणारी वसुली थांबवावी. पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतक-यांना मदत करावी असेही वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.





