राज्य सरकारचा टीम इंडियावर पैशांचा वर्षाव ; काँग्रेसची टीका, म्हणाले,’गरीबांना लुटून श्रीमंत…’

Vijay Wadettiwar । T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकाने तब्बल 11 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असून गरिबांचा पैसा लुटून श्रीमंतांना दिला जातोय” असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली .
एका वृत्तसंस्थेशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी, “शेतकरी आत्महत्या करत आहेत. आम्ही माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. चार महिन्यात आत्महत्या केलेल्या 1068 शेतकऱ्यांना पैसे दिले असते तर बरे झाले असते. जी टीम इंडिया जिंकली त्याला पैसे देण्याची गरज काय होती. पाठीवर थाप मारण्यासाठी तिजोरी लुटत असाल, तीही निवडणुकीच्या वातावरणात, तर ते योग्य नाही. गरीब आणि शेतकऱ्यांना देण्याची गरज होती. टीम इंडिया स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी 10 लाख लोक रस्त्यावर उतरले होते.” असे म्हटले.
#WATCH | Nagpur: Maharashtra Assembly LoP Vijay Wadettiwar says, “… In the last 4 months, 1068 farmers have committed suicide. It would have been good had they given money to the distressed farmers. They gave such a huge sum to the Indian Cricket Team, what was the need?…… pic.twitter.com/icoelZKMGz
— ANI (@ANI) July 6, 2024
गरिबांचा पैसा लुटून श्रीमंतांना वाटणे Vijay Wadettiwar ।
तसेच विजय वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना ,”टीम इंडियाला यापूर्वीच 120 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. मग गरिबांना लुटायचे आणि पैसे श्रीमंतांना वाटायचे, असा प्रकार घडला आहे. शेतकरी आणि तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. तिजोरी लुटली जात आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे. राज्यावर ७.९२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्याकडे पैसा नाही तरीपण लाडक्या बहिणीसाठी आणखी एक लाख कोटी काढणार” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
तिजोरीची सेवा असो वा लुटणे Vijay Wadettiwar ।
विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे सरकारवर आणखी हल्लाबोल करत,”रस्त्यावर दिवसाढवळ्या मुलींची हत्या केली जाते. आज संपूर्ण राज्य ड्रग्जने वेढले आहे. तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही. पैसे खर्च करा. निवडणुका जिंका आणि सत्ता आणा, हेच काम सुरू आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा खर्च 1800 कोटी रुपये होता, मग टेंडर रद्द करून खर्च 3200 कोटी रुपये झाला. त्यामुळे ते सेवा करत आहेत कि तिजोरी लुट? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.





