करीना कपूरसोबत रोमँटिक सीन शूट करताना विजय वर्माला फुटला ‘घाम’

entertainment news – अभिनेत्री करीना कपूर सध्या ओटीटी डेब्यू जाने जान चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर नेटाफिल्सवर रिलीज होणार आहे. जाने जान चित्रपटात करीना सोबत मुख्य भूमिकेत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत दिसणार आहे.
हा चित्रपट सस्पेंस थ्रिलर आहे. या चित्रपटात करीना ही विजय वर्मा आणि जयदीप अहलावत सोबत रोमँटिक होतांना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय वर्माने करीनासोबतच्या रोमँटिक सीनचा अनुभव शेअर केला आहे.
विजय ने सांगितले, करीना कपूरसोबत काम करणे माझे स्वप्न होते. करीना एक सिक्योर एक्ट्रेस आहे तिने मला तसेच जयदीपला कॉम्लिमेंट दिले. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला करीनाचे चित्रपट बघून मोठा झालो. आज मला तिच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ( Bollywood News , Entertainment News, kareena kapoor khan, Netflix India, )
View this post on Instagram
या चित्रपटात विजय आणि करीनामध्ये रोमांस दिसून येतो, याबाबत सांगतांना विजय म्हणाला की एका सीन दरम्यान, करिनाने माझ्याकडे बघून गाणे म्हंटले आहे या सीनवेळी मी स्वःताला हैंडल करू शकलो नाही त्यावेळी अक्षरशः मला घाम सुटला होता.
या चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास, जाने जान चित्रपटाचे डायरेक्टर सुजॉय घोष आहे. यापूर्वी त्यांनी कहाणी आणि बदला सारखे सस्पेंस चित्रपट दिले आहे. हा चित्रपट हिगाशिनो के नॉवल ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट’ वर आधारित आहे. विजय वर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो यापूर्वी श्वेता त्रिपाठीसोबत जिओ सिनेमाच्या ‘कलकूट’मध्ये दिसला होता. याशिवाय तो ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियासोबत दिसला होता. याशिवाय ‘दहाड’साठीही तो चर्चेत होता. ( Bollywood News , Entertainment News, kareena kapoor khan, Netflix India, )





