Vijay Verma, Tamannaah Bhatia | तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. मात्र, त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे कारण हे अद्यापर्यंत समोर आलेले नाही. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे दोघे सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनामुळे चर्चेत आले आहेत. या दोन्हीही कलाकारांनी अनेक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना आवडली प्रचंड आवडली होती. पण त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चाहते नाराज झाले आहे. अशातच आता विजय वर्माने एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. या प्रकरणावर बरेच दिवस मौन पाळल्यानंतर आता विजय वर्मा यांनी एका कार्यक्रमादरम्यान यावर आपले मत मांडले आहे. त्याने कोणत्याही नात्यातील प्रत्येक पैलू आत्मसात करण्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. विजयने नुकतेच आयएएनएसशी संवाद साधताना नात्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्याला नातेसंबंधांवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सूचक विधान केले आहे. मला वाटतं जर तुम्ही आईस्क्रीम सारख्या नात्याचा आनंद घेतला तर तुम्हाला खूप आनंद होईल. याचा अर्थ जी काही चव येईल, ती स्वीकारा आणि सोबत जा, त्याने केलेल्या विधानाची मोठी चर्चा होत आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघेही एकमेकांना जवळपास दोन वर्षांपासून डेट करत होते. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. लस्ट स्टोरी २ वेबसिरीजनंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला हे अद्यापर्यंत समोर आलेले नाही. नुकतेच दोघेही रवीना टंडनच्या होळी पार्टीत वेगळे एन्जॉय करताना दिसले होते.