विजय मल्ल्याचा लेक सिद्धार्थ करणार लग्न; शेअर केले ‘फोटो’

Vijay Mallyas Son Wedding । बँकांचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या फरार विजय मल्ल्याच्या लवकरच लग्न मंडप सजणार आहे. विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ त्याच्या दीर्घकाळाच्या मैत्रिणीशी लग्न करणार आहे. याची माहिती स्वतः सिद्धार्थने सोशल मीडियावर दिली आहे. सिद्धार्थच्या भावी पत्नीचे नाव जास्मिन आहे. जस्मिन आणि सिद्धार्थचे भव्य लग्न होणार आहे. लग्नाचा आठवडा सुरू झाला असून आठवडाभर हा उत्सव सुरू राहणार आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर लग्नाची घोषणा
सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ जस्मिनसोबत रोमँटिक पोज देत आहे. तो पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे तर जस्मिनने फुलांचा पांढरा ड्रेस परिधान केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘लग्नाचा आठवडा सुरू झाला आहे.’ सिद्धार्थ आणि जस्मिनला त्यांच्या फोटोवर लोकांचे खूप प्रेम मिळत आहे.
सिद्धार्थने जस्मिनला प्रपोज केले होते
याआधी सिद्धार्थने सोशल मीडियावर सांगितले होते की, ‘हॅलोविनच्या दिवशी त्याने गुडघ्यावर बसून जस्मिनला प्रपोज केले होते. यासोबतच त्याने दोन फोटोही शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सिद्धार्थला प्रपोज करताना दिसला, तर दुसऱ्या फोटोत जस्मिन तिच्या एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसली. फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहे.’
कोण आहे सिद्धार्थ मल्ल्या?
सिद्धार्थ मल्ल्याबद्दल बोलायचे झाले तर तो व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेता आहे. सिद्धार्थचा जन्म अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झाला, तो सध्या वडिलांसोबत लंडनमध्ये राहतो. त्याने लंडनमधूनच शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्याने रॉयल सेंट्रल स्कूल ऑफ स्पीच अँड ड्रामामधूनही शिक्षण घेतले आहे, त्यानंतरच तो मॉडेलिंग आणि अभिनयाच्या करिअरमध्ये आला.
कोण आहे विजय मल्ल्या?
सिद्धार्थचे वडील विजय मल्ल्या याच्याबद्दल सांगायचे तर, विजय मल्ल्या एकेकाळी दारू कंपनी यूबी ग्रुपचे चेअरमन होते. विजय मल्ल्या यांच्यावर 17 बँकांचे 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. विजय मल्ल्या याच्यावर देशात मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. विजय मल्ल्या 2016 मध्ये यूकेला पळून गेला होता. आता त्याला देशात आणण्यासाठी भारतीय एजन्सी प्रयत्न करत आहेत.





