व्हायरल व्हिडिओ, मुंबई उच्च न्यायालय अन् आता परराष्ट्र मंत्रालय… ; विजय मल्ल्या अन् ललित मोदींवर सरकारचं स्पष्टीकरण

Updated On:
व्हायरल व्हिडिओ, मुंबई उच्च न्यायालय अन् आता परराष्ट्र मंत्रालय… ; विजय मल्ल्या अन् ललित मोदींवर सरकारचं स्पष्टीकरण

Lalit Modi Vijay Mallya viral video। “आम्ही भारतातील दोन सर्वात मोठे फरार…” असे म्हणत ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ २२ डिसेंबरपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विजय मल्ल्या आणि ललित मोदी स्वतःला फरार म्हणताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्यामध्ये पिंकी लालवानी दिसत असून  तिघेही हसताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना ललित मोदी यांनी कॅप्शनमध्ये, “चला, मी पुन्हा इंटरनेटवर धुमाकूळ घालू शकतो. विशेषतः तुमच्या मीडियाच्या लोकांसाठी. जळत राहून हे पहा.” असे लिहिले आहे.

या व्हायरल व्हिडिओच्या दुसऱ्याच दिवशी, विजय मल्ल्या यांच्या खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. मल्ल्या यांनी त्यांच्या वकिलांमार्फत त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान दिले. मल्ल्या परदेशात असल्याने न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान ,  आता या व्हिडिओवर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

“आम्ही फरारांना परत आणू”  Lalit Modi Vijay Mallya viral video।

परराष्ट्र मंत्रालयाने या व्हिडीओ संदर्भात बोलताना: “आम्ही फरारांना परत आणू.” असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारतात वांछित फरारांना परत आणण्यासाठी आणि त्यांना न्यायालयात खटल्याला सामोरे जावे यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. यामध्ये अनेक कायदेशीर प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच आम्ही अनेक सरकारांशी चर्चा करत आहोत जेणेकरून त्यांना येथील न्यायालयांमध्ये खटल्याला सामोरे जावे लागेल. असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रणधीर जयस्वाल यांनी ही प्रतिक्रिया दिली. ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे दोघेही भारतात वाँटेड फरार आहेत आणि त्यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत.

१५ व्यक्ती फरार घोषित Lalit Modi Vijay Mallya viral video।
सरकारच्या वतीने, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ (FEOA) अंतर्गत एकूण १५ व्यक्तींना फरार आर्थिक गुन्हेगार (FEO) घोषित करण्यात आले आहे. यापैकी नऊ व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीत सहभागी आहेत. या यादीत विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारख्या अनेक हाय-प्रोफाइल नावांचा समावेश आहे. या १५ फरार आरोपींनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बँकांना एकूण २६,६४५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. शिवाय, या कर्जांवर एनपीए झाल्यापासून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत व्याज ३१,४३७ कोटी रुपये आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत, या कर्जबुडव्यांकडून १९,१८७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

2026-07-09 20:11:58

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! 'या' 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

2026-07-09 19:34:35

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! 'या' 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे आणखी 2 आमदार सोडणार साथ? बैठकीला होते गैरहजर

2026-07-07 21:39:37

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे आणखी 2 आमदार सोडणार साथ? बैठकीला होते गैरहजर

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्यासाठी शत्रुघ्न सिन्हांची साद; बांकीपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

2026-07-07 18:51:27

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्यासाठी शत्रुघ्न सिन्हांची साद; बांकीपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

लक्षवेधी : राजकारणच संकटात!

2026-07-07 05:30:58

लक्षवेधी : राजकारणच संकटात!