Vijay Mallya: “मी फरार नाही, मला माझे पैसे कधी परत मिळतील?” ; विजय मल्ल्याची सरकारकडेच नुकसान भरपाईची मागणी
Vijay Mallya: देशातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेले यूके-स्थित मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Vijay Mallya: देशातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेले यूके-स्थित मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्याला फरार घोषित करण्यावर आक्षेप घेत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी,”ते यूकेचे नागरिक आहेत आणि यूके सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे.” असा दावा त्यांनी केला आहे.
विजय मल्ल्या यांच्यावर अंदाजे ९,९०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप आहे. यापैकी सर्वात मोठे कर्ज एसबीआयचे आहे. मल्ल्या मार्च २०१६ मध्ये परदेशात फरार झाले ते आजपर्यंत भारतात कधीच परत आले नाहीत.
फरार घोषित करण्यावर आक्षेप Vijay Mallya:
विजय मल्ल्या यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहिले, “जे लोक म्हणतात की मी एक फरार व्यक्ती आहे जो भारतात परतण्यास नकार देत आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की मी १९९२ पासून युनायटेड किंगडमचा कायम रहिवासी आहे आणि सध्या मला कायदेशीररित्या हा देश सोडण्यास बंदी आहे. हे सर्व भारत सरकारच्या ‘पोस्टर बॉय’ वृत्तीमुळे सुरू झाले, ज्यांनी माझ्या प्रकरणात अत्यंत अन्यायकारक भूमिका घेतली आहे.”
For all who say I am a bhagoda refusing to come to India, please be aware that I have been a permanent resident of the United Kingdom since 1992 and am currently legally prohibited from leaving this country. All this started with poster boy actions by the Government of India who…
— Vijay Mallya (@TheVijayMallya) September 8, 2026
ईडीकडून मालमत्ता जप्त
त्याने पुढे लिहिले, “ज्या लोकांना माझ्यावर शंका आहे, त्यांनी स्वतः पडताळून पाहावे की ईडीने किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी माझ्या जप्त केलेल्या निधीतून ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. ईडीने माझी मालमत्ता/निधी जप्त केल्यामुळे मी ते पैसे देऊ शकलो नाही.”
मला माझा परतावा कधी मिळेल? Vijay Mallya:
जे लोक निष्पक्ष आणि अचूक हिशेब आणि न्यायावर विश्वास ठेवतात, त्यांनी कृपया खालील तक्ता पाहावा. माध्यमांकडून मला जी वागणूक मिळते, जिथे पत्रकाराच्या स्क्रिप्टच्या सुरुवातीपासूनच मला फसवणूक करणारा म्हटले जाते, ती वागणूक मिळण्यास मी खरोखरच पात्र आहे का? मला माझा परतावा कधी मिळेल, असे का विचारू नये?
सीबीआयने विजय मल्ल्याविरुद्ध कर्ज घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर तो लंडनला फरार झाला. ईडीने त्याच्याविरुद्ध आणि किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. जानेवारी २०१९ मध्ये विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आले.





