Vijay Hazare Trophy 2021 : हिमाचल प्रदेशवर मुंबईचा मोठा विजय
Updated On:

जयपूर – सूर्यकुमार यादव, आदित्य तरे व शार्दुल ठाकूर यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशवर मोठा विजय मिळवला. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 9 बाद 321 धावा केल्या. त्यात ठाकूर 92, सूर्यकुमार 91 व तरे याने 83 धावांची खेळी केली. त्यांच्या पैकी एकालाही शतक पूर्ण करता आले नाही मात्र, त्यांनी संघाला त्रिशतकी धावांचा टप्पा गाठून दिला. विजयासाठी 322 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हिमाचलचा डाव 25 व्या षटकात 121 धावांवर संपला व मुंबईने 200 धावांनी मोठा विजय नेंदवला.
हिमाचलच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहून लढत देता आला नाही. मुंबईच्या प्रशांत सोळंकीने 4 तर शम्स मुलाणीने 3 गडी बाद करत संघाच्या विजयाला हारभात लावला.





