विजय गोडसे कराड डीबीचे नवे कारभारी

कराड – गेल्या वर्षभरापासून कराडची गुन्हे अन्वेषण शाखेत अस्थिरता होती. येथील चार अधिकाऱ्यांची अल्पावधीतच बदली झाल्याने या डीबीची घडी विस्कटली होती. आता कराडच्या डीबीला सक्षम व पूर्णवेळ कारभारी मिळाला असून नुकताच या शाखेचा चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी घेतला असून कराडच्या डीबीची घडी बसवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुन्हे अन्वेषण शाखेत यापूर्वी असलेल्या भरत चंदनशिव यांनी यांना शहरात हवी तशी कामगिरी बजावता आली नाही. त्यांची नुकतीच बदली झाल्याने याठिकाणी कोणता अधिकारी येणार याची चर्चा होती.

कराड शहर विस्तीर्ण असून शहराला राजकीय, सामाजिक व ऐतिहासिक असा मोठा वारसा आहे. शहरात टोळी युद्धातून नुकत्याच झालेल्या खुनामुळे डीबीची घडी विस्कळीत झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता येथे काम करणे हे मोठे आव्हानात्मक आहे. मात्र हे आव्हान संधी स्वरूपात घेऊन या शाखेला आणखीन गतिमान, कार्यक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे त्यांनी दै. प्रभातशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.