Vijay Rashmika : विजय-रश्मिकाच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण; अनफाॅलोचं नेमकं राज काय?
Vijay Rashmika : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Vijay Rashmika : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. विजय यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सध्या कोणालाही फॉलो केलेले नाही. त्यात रश्मिकाचाही समावेश आहे. त्यामुळे काही सोशल मीडिया युजर्सनी दोघांच्या नात्यात अडचणी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काहींनी तर लवकरच दोघांचा घटस्फोट होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू केली.
मात्र, या चर्चांना कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही. काही युजर्सनी विजय आणि रश्मिका यांनी सुरुवातीपासूनच इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ सोशल मीडिया फॉलोइंगवरून त्यांच्या नात्याबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
SHOCKING 😯 #RashmikaMandanna and #VijayDeverakoda Have Unfollowed Each Other on Instagram.
What could be the real reason behind this?
Rumours suggest that Rashmika Mandanna and Vijay Deverakonda may be facing some issues in their #relationship #Trending #RanaBali https://t.co/kOY72kUHx9
— Pallaꪜ𝔦 (@Pallavi_M9) October 24, 2026
उपलब्ध माहितीनुसार, विजय देवरकोंडा यांच्या अकाउंटचा फॉलोइंग काउंट शून्य आहे. दुसरीकडे, रश्मिका मंदाना मात्र विजयला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असल्याचा दावा पूर्णपणे अचूक नसल्याचे दिसते.
दरम्यान, विजय आणि रश्मिका अलीकडे ‘कॉफी विथ करण ९’ या लोकप्रिय चॅट शोमुळेही चर्चेत आले होते. या कार्यक्रमात विजयने रश्मिकाने त्याला लग्नासाठी सुमारे १०० वेळा विनंती केल्याचे सांगितले. रश्मिकानेही एका वर्षात वारंवार विजयला लग्नाबाबत विचारल्याचे म्हटले होते. या वक्तव्यांनंतर त्यांच्याबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.
True??😲👀 https://t.co/aPJ0GZEhOA
— Fz (@iam___smash) October 24, 2026
डिस्क्लेमर : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावरील चर्चा किंवा फॉलोइंगवरून त्यांच्या वैयक्तिक नात्याबाबत निष्कर्ष काढू नये.





