Vijay And Trisha Krishnan: पुन्हा एकाच मंचावर विजय आणि तृषा! चेन्नईतील हायप्रोफाइल रिसेप्शनमधील फोटो व्हायरल
Vijay And Trisha Krishnan रुवारी, ५ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील द लीला पॅलेस येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला. आंध्र प्रदेशातील राजकीय नेते वायएस अनिल रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. अनिल रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांचे चुलत भाऊ आहेत.

Vijay And Trisha Krishnan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री असलेले विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाइल लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या दोघांनी हजेरी लावली. या कार्यक्रमातील विजय आणि तृषा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही एकाच मंचावर एकत्र दिसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये या उपस्थितीची चर्चा सुरू झाली आहे.
नेमका कोणाच्या लग्नाला लावली हजेरी?
गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील द लीला पॅलेस येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला. आंध्र प्रदेशातील राजकीय नेते वायएस अनिल रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. अनिल रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांचे चुलत भाऊ आहेत. या सोहळ्याला राजकारण, चित्रपट आणि उद्योगविश्वातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये विजय आणि तृषा यांच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले.

Vijay And Trisha Krishnan
विजय-तृषाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विजय आणि तृषा एकत्र मंचावर जाताना दिसत आहेत. दोघांनीही नवविवाहित जोडपे श्रेया आणि उज्ज्वल यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासोबत फोटोही काढले. या कार्यक्रमासाठी विजयने ब्राऊन रंगाचा सूट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर तृषा गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत दिसली. तिच्या या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
या कार्यक्रमाला विजयची आई शोभा चंद्रशेखर यादेखील उपस्थित होत्या. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे पत्नी वायएस भारती यांच्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाले होते. एका व्हिडीओमध्ये विजय आणि जगन मोहन रेड्डी एकमेकांशी संवाद साधताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. जगन यांच्या आई वायएस विजयम्मा यादेखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या.
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. केटी रामा राव हे पत्नी शैलिमा यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या रिसेप्शनमध्ये राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.

Vijay And Trisha Krishnan
विजय आणि तृषा यांची जोडी पुन्हा चर्चेत
विजय आणि तृषा यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामध्ये ‘लिओ’ या चित्रपटाचाही समावेश आहे. पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे दोघेही जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगते.
यापूर्वी मार्च महिन्यातही विजय आणि तृषा चेन्नईमध्ये एका विवाह रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले होते. प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते कल्पती एस. सुरेश आणि मीनाक्षी सुरेश यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी विजयची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी चर्चेत होती. मात्र, त्यानंतर संगीताने हा अर्ज मागे घेतला होता.
त्यानंतर मे महिन्यात विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या कार्यक्रमालाही तृषाने उपस्थिती लावली होती. यावेळी ती विजयच्या कुटुंबीयांसोबत दिसली होती. सप्टेंबर महिन्यातही दोघे ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन सर्किट येथे एकत्र दिसले होते. अभिनेता अजित कुमार मिशेलिन ले मॅन्स कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचले होते.
आता पुन्हा एकदा विजय आणि तृषा एकाच कार्यक्रमात एकत्र दिसल्याने त्यांच्या उपस्थितीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दोघांनीही या भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.





