Vidya Balan – अभिनेत्री विद्या बालनच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून लोकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी विद्याने मुंबई पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विद्या बालनच्या या बनावट खात्यावरून लोकांना नोकरी लावण्याच्या अमिषाने पैसे वसुल करण्याचा प्रकार घडला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. । Vidya Balan विद्या बालनचे ऑनलाइन अनेक फॉलोअर्स आहेत आणि ती तिच्या चाहत्यांना आवडणारे व्हिडिओ आणि रील तयार करत असते. कोणीतरी तिच्या नावाचा गैरवापर करून लोकांकडून पैसे मागत असल्याची बाब तिच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने पोलिसांत धाव घेतली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने विद्या बालन सारखाच इन्स्टाग्राम आयडी बनवला आणि एक जीमेल खाते देखील बनवले आणि नंतर त्या खात्यांचा वापर करून त्याने बॉलिवूडशी संबंधित लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यातून मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. । Vidya Balan