Vidhan Parishad Result । महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी; कुणाला किती मतं मिळाली? पाहा….

Vidhan Parishad Result । विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २७४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून यामुळे कोणाचा पत्ता कात होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सायंकाळी ५ वाजता मतदान मोजणीस सुरुवात झाली असून सुरुवातीचे दोन्ही निकाल भाजपसाठी गोड ठरले आहेत. भाजप उमेदवार योगेश टिळेकर व पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक असलेला २३ मतांचा कोटा पार केल्याने या दोघांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे.
तर, अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार सुद्धा विजयी झाले आहेत. राजेश विटेकर २३ आणि शिवाजी गर्जे २४ मत मिळाली आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी २४ मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. तर दुसरे उमेदवार कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. त्यांना २५ मतं मिळाली आहेत.
विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार :
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर





