Vidhan Parishad Election : अखेर विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे रोजी रिक्त होत आहेत.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांची अखेर तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या आमदारांमार्फत निवडून आलेले उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संजय केणेकर यांसारख्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानुसार आता विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं आहेत, अशात महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
आमदारांच्या संख्याबळावरून विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळेल असं चित्र आहे.
विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक
- महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी निवडणुकीचा अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी जारी केली जाईल.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे.
- अर्जांची छाननी २ मे २०२६ रोजी केली जाईल.
- अर्ज मागे घेण्यासाठी ४ मे २०२६ ही अंतिम मुदत
- निवडणुकीसाठी मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडेल.
- मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मतांची मोजणी होईल.
कोणत्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार?
विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे रोजी रिक्त होत आहेत. ज्यात संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील, उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे हे विद्यमान सदस्य निवृत्त होत आहेत. Vidhan Parishad Election
महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य आहेत. त्यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. त्यातील ९ जणांची मुदत येत्या १२ मे रोजी संपत आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सदस्यांचा निरोप सोहळा पार पडला. Vidhan Parishad Election
हेही वाचा:
Sonali Kulkarni : विमानात महिलेच्या ‘त्या’ कृत्यावर सोनाली कुलकर्णी संतापली






