हडपसर – येथील हांडेवाडी रोडवरील यश रवी पार्क सोसायटी समोरील भागात वाट पहात थांबलेल्या एका महिलेच्या हातातील पर्स दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (दि. २१) दुपारी ही घटना घडली.
यश रवी पार्क सोसायटीच्या समोरील भागात एक महिला उभी होती. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे पायीच तेथे आले. महिलेच्या हातातील पर्स हिसकावून या चोरट्यांनी रस्त्यावरून पळ काढला.
यावेळी महिलेने या चोरट्यांचा पाठलाग केला, परंतू पाऊण एक किलोमीटर गेल्यानंतर महिला थांबली तर चोरटे तसेच पुढे पळून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.