Video : …सांगू का पोलिसांना उचलायला; अजित पवारांनी सभेतच कॅमेरामनला भरला दम

पुणे – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या कडक स्वभावासाठी सर्वांना परिचित आहेत. चुकीचं काही घडत असेल तर ते ताबडतोब समोरच्या व्यक्तीला खडसावतात. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होतात. त्यांचा आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये ते कॅमेरामेनला दम देत आहेत.
राज्यात पहिली दुसरी आणि तिसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता असून त्यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मास्क वापरलाच पाहिजे असे सांगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नजर समोर असलेल्या कॅमेर्याच्या शेजारी बसलेल्या कॅमेरामन कडे गेली. त्यानंतर ते भाषणात उद्गारले.
Video : … सांगू का पोलिसांना उचलायला; अजित पवारांनी सभेतच कॅमेरामनला भरला दम pic.twitter.com/GnNvkkkXD7
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 28, 2021
ते म्हणाले की, आता बघा ह्या पठ्ठ्यानं तर मास्कच काढून टाकले. शुटींग घेतोय पोलिसांना सांगु का आता तुला उचलायला. आरे तु मास्क काढल्यामुळे शेजारच्याला व्हायचा करोना असे म्हणत ते म्हणाले परत म्हणतात दादा लयच कडक आहेत. मात्र काळजी ही घ्यायलाच हवी असं ही त्यांनी सांगितल.





