#video : तेजप्रताप यादव यांची कार्यकर्त्याला धक्काबुक्की; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : बिहार सरकारमधील पर्यावरण आणि वनमंत्री तेजप्रताप यादवयांचा एका व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यादव यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तेजप्रताप हे रागात असल्याचे दिसून येत असून राजद कार्यकर्त्याचा गळा आवळताना दिसत आहेत.
तेजप्रताप यादव यांचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ 22 ऑगस्टचा असल्याचे सांगितले जात आहे. तेजप्रताप यादव हे आपले आई-वडील राबडी देवी आणि लालूप्रसाद यादव यांच्यासमवेत गोपालगंजच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. लालूप्रसाद यादव अनेक वर्षांनंतर आपली सासरवाडी सेलार कलेत दाखल झाले. येथे पोहोचताच लालू, राबडी आणि तेजप्रताप यादव यांच्या स्वागतासाठी शेकडो लोक उपस्थित होते.
Tej Pratap Yadav misbehaving with RJD supporter Sumant Yadav pic.twitter.com/DheYYV4BF0
— Mohit Babu 🇮🇳 (@Mohit_ksr) August 24, 2023
लालूप्रसाद यादव-राबडी देवी यांच्यासोबत घरात प्रवेश करत असताना धक्काबुक्कीची घटना घडली. दरम्यान, तेजप्रताप यादव यांनी पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याचा गळा दाबून धक्का बुक्की केली. यावेळी तेजप्रताप प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
‘सुमंत यादव’ असे धक्काबुक्की झालेल्या तरुणाचे नाव असून तो राजदचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तेजप्रताप यांनी त्याला धक्का का दिला हे अद्याप समजू शकलेले नाही. सुमंत यादव यांनी तेजप्रताप यांना सलाम केला. यावर तेजप्रताप संतापले आणि त्यांनी सुमंत यादव यांचा गळा दाबून त्यांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.




