राज्यसभेच्या कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे अंगलट; खासदार रजनी पाटील यांचे निलंबन
Updated On:

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. राज्यसभेच्या कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल संबंधित कारवाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत भाषण केले. ते बोलत असताना विरोधकांनी गदारोळ केला. त्याचे रेकॉर्डिंग केल्याबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी पाटील यांना निलंबित केले.
संबंधित कारवाई अन्याय्य स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटूंबातील मी सदस्या आहे. मला योग्य न्याय मिळायला हवा होता. मी जाणूनबुजून काही केले नाही. माझ्यावर हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले. मला देण्यात आलेली अतिशय कठोर शिक्षा योग्य नाही. माझी अपमानित करण्यात आल्याची भावना बनली आहे, असे त्या म्हणाल्या.





