VIDEO : रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली कार; किंमत वाचून व्हाल थक्क…

मुंबई – दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सध्या सोशल मीडियावर देखील ते सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत ते सोशल मीडियाद्वारे माहिती शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी एक नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. इनस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
सोशल मीडियावर रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नी मेघना जाधव देखील दिसत आहेत. “आमच्या कुटुंबात नवीन आलिशान इकोफ्रेंडली गाडी दाखल झाली आहे” असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर त्यांनी नवी कोरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.
रवी जाधव यांनी खरेदी केलेली गाडी पांढऱ्या रंगाची असून या कारचे नाव Toyota Hycross ZX(O) असे आहे. या गाडीची ऑनलाइन किंमत 30 लाखांहून अधिक आहे. रवी जाधव यांनी नवीन गाडी घेतल्याने नेटकऱ्यांनी रवी जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रवी जाधव यांचे ‘बालगंधर्व’, ‘टाईमपास’, ‘बालक पालक’, ‘बेन्जो’, ‘कच्चा लिंबू’, ‘नटरंग’ असे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. रवी जाधव यांचा ‘मे अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. तर त्यांच्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत. रवी जाधव यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.





