Video : आमदार निलेश लंके यांनी सोडवली आळेफाटा चौकातील वाहतूक कोंडी

बेल्हे – आळेफाटा येथील चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत असून वाहणचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दरम्यान पारनेर चे आमदार निलेश लंके हे आळेफाटा (ता.जुन्नर) या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले असता येथील चौकात ट्रॅफिक झाल्याने त्यांनी स्वतः गाडीतुन खाली उतरुन जवळपास अर्धा ते एक तास थांबुन पोलिसांना ट्रॅफिक हटवण्यासाठी मदत केली.
आळेफाटा हे नगर -कल्याण व पुणे – नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असुन येथील चौकात नेहमीच वाहणांची गर्दी असते त्यातच सध्या लग्न सराई चालु असल्याने या ठिकाणी दररोज ट्रॅफिक होऊन वहाणांच्या रांगा लागत आहे. मात्र येथील पोलीस प्रशासन अपुऱ्या स्टाफ सह आपले कर्तव्य चोख बजावत आहे. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे
यामध्ये विशेष करुन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, कॉन्स्टेबल फलके, ताजणे व इतर सर्वच स्टाफ सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे काहीसा दिलासा वाहतूक प्रवाशांना मिळाला आहे. दरम्यान, आळेफाटा बायपास चे काम अंतिम टप्यात असून बायपास शेजारील सब रस्ता खुला केल्यास कमीत कमी नाशिक पुणे रोड वरील ट्राफिक काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल.





