#video : किळसवाणा प्रकार! चालत्या बसमध्ये कंडक्टर अन् तरुणीचं आक्षेपार्ह कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Updated On:

लखनऊः  आजकाल सामाजिक भान राखून वागण्याला काही लोकांनी तिलांजली दिली असल्याचे प्रकार रोज उघडकीस येत आहेत. त्यातच आता  उत्तर प्रदेशमधील एक किळसवाणी घटना समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून या व्हिडीओत चालत्या बसमध्ये एक कंडक्टर तरुणीसोबत  आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचे दिसत आहे.

बसमधील प्रवाशांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. काही प्रवाशांनी कंडक्टर आणि तरुणीचा अश्लील व्हीडिओ काढला. हा व्हीडिओ सध्या मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर परिवहन विभागाने त्या वाहकाची सेवा समाप्त केली आहे. सदरील व्हीडिओ दहा दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस डेपोची बस लखनऊकडे निघाली होती. बसमधील प्रवासी झोपले होते. याच संधीचा फायदा घेऊन कंडक्टर आणि एक तरुणी चालत्या बसमध्ये  अश्लील कृत्य करत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी पांघरून घेतले होते.

एका प्रवाशाने जेव्हा दोघांना आक्षेपार्ह स्थितीमध्ये बघितले तेव्हा त्याने त्यांचा एक व्हीडिओ तयार केला. व्हीडिओ शूट होत असल्याचे लक्षात येताच सदरील कंडक्टर चिडला आणि मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवाशी आणि कंडक्टमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर परिवहन विभागाने कारवाई केली असून सदरील वाहकाची सेवा समाप्त केली आहे. हा व्हीडिओ १० दिवस जुना आहे. प्रवाशांनी सदरील कंडक्टरची तक्रार केली होती. तक्रार आणि व्हीडिओच्या आधारावर कंडक्टरवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी