VIDEO : ‘पैसे पाहिजे का?’ धर्मेंद्रंच्या अस्थी विसर्जनादरम्यान पुन्हा सनी देओल पापराझींवर संतापला

Sunny Deol | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्या. यावर देओल कुटूंबाकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता. आजारी धर्मेंद्र यांच्या कव्हरेजमुळे याआधी सनी देओल संतापला होता.
ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सनी देओल पुन्हा एकदा पापाराझीवर संतापला आहे. धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या सनी देओलनं पापाराझीकडे येत त्याच्या हातातून कॅमेरा हिसकावून त्याला चांगलेच सुनावले.
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी त्यांचा लेक बॉबी देओल आणि सनी देओल हरिद्वारला पोहोचले होते. या दिग्गज अभिनेत्याच्या अस्थी हरिद्वारमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यावेळी धर्मेंद्र यांचा धाकटा लेक बॉबी देओलचा अश्रूंचा बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. अस्थी विसर्जनावेळी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यावर पापाराझींनी कॅमेरे रोखले होते. त्यावेळी सनी देओलला राग अनावर झाला आणि त्यानं तिथे उभ्या असलेल्या एका पापाराझी सुनावलं. Sunny Deol |
#SunnyDeol‘s fiery message to the paparazzi😡 A powerful moment that shows where his priorities lie🙏
Have you guys sold your shame?
” पैसे चाहिए तेरे को कितने पैसे चाहिए ”Sunny’s anger is totally justified, Some time celebrities just need to be human 😞
Respect the family… pic.twitter.com/q9mUZmVDIP— Mr Prabh Deol (@Movie_flix1) December 3, 2025
‘जर पैसे हवे असतील तर ते घे…’
व्हायरल व्हिडीओमध्ये सनी देओल एका पापाराझीवर चिडल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये, तो पापाराझीचा कॅमेरा हिसकावून घेत म्हणाला की, “असं करू नको, पैसे हवेत का? तुला किती पैसे हवेत? जर पैसे हवे असतील तर ते घे…” हा व्हिडीओ देओल कुटुंब बुधवारी धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वार येथे गेल्यानंतर घडलेला हा प्रकार असल्याचे म्हंटले जात आहे. यावर सोशल मिडियावर नेटकरी देखील विविध प्रतिक्रिया देत आहेत. Sunny Deol |
दरम्यान, यापूर्वी जेव्हा पॅप्स सनीच्या घरी बाहेर फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सनीने त्यांना शिवीगाळ केली होती. धर्मेंद्रांच्या अंत्यसंस्कारात अमिताभ बच्चन, अगस्त्य नंदा, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सलमान खान, आमिर खान, सलीम खान आणि शाहरुख खानसह अनेक इतर लोक सहभागी झाले होते. Sunny Deol |
हेही वाचा:
New Year Trip: नवीन वर्षे नवीन जागा! ट्रिप प्लान करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स





