New Year Trip: नवीन वर्ष सुरू करताना अनेक जण कुटुंबीय, मित्र किंवा पार्टनरसह फिरायला जाण्याचा बेत आखतात. वर्षभराच्या कामाच्या धकाधकीनंतर आणि तणावानंतर 2-3 दिवसांच्या छोट्या ट्रिपमुळे मन फ्रेश होते आणि नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता येते. यावेळी लोक प्रामुख्याने हिमाच्छादित डोंगर, हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणांवर जाणे पसंत करतात. परंतु नववर्षाच्या काळात अनेक ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे ट्रिप प्लान करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर तुमची ट्रिप अधिक आनंददायी आणि त्रासमुक्त होऊ शकते. १. आगाऊ बुकिंग करा न्यू इयरच्या काळात फ्लाइट, ट्रेन आणि हॉटेल्स बहुतेक वेळा फुल असतात. म्हणून, कुठे जायचे ते ठरवून कमीत कमी २–३ आठवडे आधी हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट बुक करा. यामुळे शेवटच्या क्षणी त्रास होणार नाही आणि योग्य दरात बुकिंग मिळेल. २. हवामानानुसार ठिकाण निवडा हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-कश्मीरमध्ये या काळात प्रचंड गर्दी असते आणि तापमान खूप कमी असते. तुम्हाला लवकर सर्दी-जुकाम होत असेल तर थंड डेस्टिनेशन टाळा. शांत वातावरणात वेळ घालवायचा असेल तर गर्दीपासून दूर असलेली ठिकाणे निवडा. ३. हॉटेल आणि पर्यटनस्थळांचे रिव्ह्यू जरूर वाचा ऑनलाइन फोटोवर विश्वास ठेवून अनेकदा लोक चुकीचे हॉटेल बुक करतात. बुकिंग करण्यापूर्वी, हॉटेलची रेटिंग आणि रिव्ह्यू जरूर तपासा. यामुळे स्वच्छता, स्टाफचे वर्तन, सुरक्षा आणि आसपासच्या सुविधा याबद्दल अचूक माहिती मिळते. ४. बजेट नीट ठरवा ट्रिपचे बजेट आधीच आखणे खूप महत्त्वाचे. यात, हॉटेल ट्रान्सपोर्ट खाणे पर्यटनस्थळांचे तिकीट शॉपिंग इमर्जन्सी फंड या सर्वांचा अंदाज ठेवा. बजेट ठरवल्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो. ५. आवश्यक सामान सोबत ठेवा प्रवासापूर्वी त्या ठिकाणाचे हवामान जाणून घ्या आणि त्यानुसार, गरम/थंड कपडे वैयक्तिक औषधे उलटी, डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या टॉर्च एक्स्ट्रा रोख रक्कम (कारण काही ठिकाणी ऑनलाइन पेमेंट चालत नाही) हे सर्व सोबत ठेवा. या सोप्या टिप्सचा विचार करून ट्रिप प्लान केल्यास तुम्ही नववर्षाचा आनंद कोणत्याही अडचणीशिवाय मनसोक्त साजरा करू शकता!