#Video : दबंग खानने बनविले गावरान पद्धतीचे झणझणीत जेवण

Updated On:

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान हा चित्रपटसृष्टीतील हिट स्टार्सच्या यादीत गणला जातो. सलमान खान हा चित्रपटांशिवाय त्याच्या दरियादिलीसाठीही ओळखला जातो. सलमान हा संकटकाळात अनेक वेळा गरजू लोकांच्या मदतीला धावून आल्याचे पाहण्यात आलेले आहे.  लॉकडाऊनमध्येही त्याने अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यातच सलमान खान हा सोशल मीडियावरही खूपच ऍक्‍टिव्ह असतो.

सध्या सलमानचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला असून त्याच्या या व्हिडिओवर लाखो चाहत्यांनी लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान चुलीवर जेवण बनवताना दिसत असून, सलमान जेवणाला लसूण आणि आल्याचा तडका देताना दिसत आहे. तर बीना काक सलमान खानला कोथिंबीर देताना दिसत आहे.त्याचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

यापूर्वी देखील सलमानचे असेच काहीसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. ज्यामध्ये दबंग खान कधी शेती करताना तर, कधी घोडंस्वारी करताना  दिसून आला होता. अभिनेता सलमान खानचा एक विशिष्ठ असा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच सलमानने आपला ५५ वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत पनवेल येथील फार्महाऊस वर मोठ्या उत्साहात साजरा केला.

आणखी संबंधित बातम्या

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

2026-04-02 12:59:14

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

2026-04-02 09:08:17

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

2026-04-01 10:00:04

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

2026-03-31 14:46:31

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

2026-03-31 12:06:37

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक