Sharad Pawar Live : ‘उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार’; शरद पवारांची तातडीची पत्रकार परिषद

Updated On:

Lok Sabha Result 2024 Live : लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला.

अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल आज 4 जून रोजी जाहीर होणार आहे. देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून, बरेच निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान पार पडले. तर, शेवटच्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. सध्या महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय. तर, दुसरीकडे आघाडी सरकारने अनेक ठिकाणी विजयाचा गुलाल अंगावर उधळला आहे.

निकालानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या प्रतिकिया दिली आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे आभार. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. निवडणुकीचा निकाल आला आहे. हा निकाल इतर परिवर्तनाला पोषक असा आहे.

तर, उद्या दिल्लीत बैठक घेणार असून, परिस्थिती पाहून पुढची चर्चा करणार आहोत. फक्त मंदिर- मशीद वरून राजकारण होत नाही. मध्य प्रदेशात अजून काम करण्याची गरज असल्याचं देखील पवार यावेळी म्हणाले. भाजपच्या पक्ष फोडीच्या नीतीला जनतेने धडा शिकवला आहे.

आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले. मी मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येचुरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आज संध्याकाळी याबाबत निश्चित आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ.

आम्ही 7 जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. 10 पैकी 7 जागा जिंकण मोठं आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगलं मिळालं.

या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे आणि त्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

2026-09-22 13:45:57

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

2026-09-22 11:30:15

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

2026-09-21 15:54:00

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

2026-09-21 15:41:56

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

2026-09-21 15:22:19

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा