VIDEO: अजय देवगणची लेक न्यासा पुन्हा एकदा ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘ही कायम…’

मुंबई – बॉलीवूडचे स्टारकीड्स नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लेक न्यासा हीचा देखील समावेश आहे. सेलिब्रिटींप्रमाणे त्यांच्या मुलांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर सक्रिय असणारी न्यासा देखील पुन्हा ट्रोल झाली आहे. मात्र तिला का ट्रोल केले जात आहे. ते जाणून घेऊ…
न्यासाला एका ठिकाणी गेली होती. त्यादरम्यानचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की न्यासाला नीट चालता येत नाही. इतकेच काय तर गाडीत बसताना तिचा तोल जातो. मात्र तेवढ्यात तिची मैत्रिण न्यासाला सावरते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ‘ही न्यासा नाही तर नशा आहे’, ‘ही कायम धडपडत असते’, ‘ती धडपडली यात काहीच नवीन नाही’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, न्यासा देवगण अनेकदा तिच्या व्हायरल पार्टी फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. याशिवाय न्यासा देवगण तिच्या हॉट आणि सिझलिंग फोटोंमुळे देखील नेहमीच चर्चेत असते, तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. बोल्ड अंदाज असो वा डिनरडेट आजकाल न्यास सगळीकडेच पाहायला मिळते. मात्र अनेकदा ती ट्रोलिंगची शिकार देखील होते. सोशल मीडियावर न्यासा देवगणला खूप ट्रोल केलं जातं.





