#video : अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना राणावत’ नेहमीच तिच्या सिनेमासाठी 100 टक्के योगदान देते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कंगनाने तिच्याबद्दलचा हा समज आपल्या कष्टाने सार्थ ठरवला आहे. त्यावरून तिची कष्टाची तयारी किती आहे, हे समजू शकते.
नुकतंच कंगनाच्या आगामी ‘धाकड’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझर मध्ये ‘अॅक्शन, स्टाईल आणि धमाका’ हे सर्व दिसून येत आहे. या चित्रपटात कंगना ‘एजंट अग्नि’च्या भूमिकेत दिसणार आहे. तिने आपले सात वेगवेगळे लूक आणि अनेक कॉम्बेट सीन्समधून प्रेक्षकांना चकीत केले आहे.
दरम्यान, हा चित्रपट आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांचे डिझाईन आणि कोरियोग्राफी असलेला सिनेमा आहे. या चित्रपटासाठी कंगनाने फाईट सीनची विशेष प्रॅक्टिस देखील केली आहे. कंगनाची ही आणखी एक झुंजार भूमिका असलेला चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘धाकड’ चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता अर्जुन रामपालदेखील असणार आहे. सिनेमाचा बहुतेक शूटिंग बुडापेस्टमध्ये झाले आहे. अर्जुनने बुडापेस्ट मधील त्याचे काही फोटो सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केले होते.





