आगामी सिनेमात विकी कौशल साकारणार ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांची भूमिका; ‘या’ दिवशी होणार शूटिंगला सुरुवात

मुंबई – बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या सारा अली खानसोबत त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. अशातच या दोघांनीही त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.
विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका…
अभिनेता विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची माहिती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिली आहे. ते म्हणाले कि, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विक्की कौशलची लूक टेस्टही केली नाही, कारण तो ही भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे साकारणार असल्याचा मला विश्वास आहे’ असं ते म्हणाले.
‘जरा हटके जरा बचके’ च्या प्रमोशनमधून मुक्त झाल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्री-प्रॉडक्शनवर काम करणार आहेत. त्यांनी यावर खूप काम केले आहे आणि आता स्क्रिप्टला अधिक धार देत आहे. तसेच लोकेशन, कॉस्च्युम आणि कास्टिंगवरही चांगले काम केले जाणार आहे. तसेच येत्या ऑक्टोबर मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अतिशय उत्सुक-
विकी कौशलची भुमिकेबाबतची तयारी जुलै-ऑगस्टपासूनच सुरु केली जाणार आहे. तो प्रथमतः शब्दलेखनाचे प्रशिक्षण घेणार आहे. याशिवाय घोडेस्वारी, तलवारबाजी यांसारख्या गोष्टीही शिकवल्या जाणार आहेत. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. या भूमिकेसाठी तो आपले सर्वस्व द्यायला तयार आहे. अशी माहिती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिली आहे.





