Ameesha Patel : ‘गदर ३’ बद्दल मोठी घोषणा; अमिषा पटेलची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
Ameesha Patel : अमिषा पटेलने 'गदर ३' चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Ameesha Patel : अमिषा पटेल आणि सनी देओल यांचा ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. तारा सिंग आणि सकीना यांच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली.
‘गदर’च्या अभूतपूर्व यशानंतर बावीस वर्षांनी २०२३ मध्ये त्याचा सिक्वेल प्रदर्शित झाला आणि त्यानेही बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले. आता अमिशा पटेलने या फ्रँचायझीमधील तिसऱ्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. (Ameesha Patel)
अमिषा पटेलने ‘गदर ३’ चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले, “गदर ३ नक्कीच येत आहे, आणि जेव्हा तो येईल… तेव्हा थिएटरमध्ये धुमाकूळ माजेल. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि देवाच्या आशीर्वादाने… ‘गदर’सारख्या ब्रँडसाठी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई ही फक्त सुरुवात आहे. यावेळी चित्रपटाचा आवाका आणि कथा आणखी मोठी आणि अधिक स्फोटक असेल. तयार रहा.”
GADAR 3 will come fr sure and JAB aayegi . Theatre mein hungama mach Jayega . With audiences love and gods blessings .. 500 cr is just the minimum nos at the box office for a brand like GADAR 👌👌🙏🏻❤️and this time the scale and script willl be even bigger and dhamakedar . Be…
— ameesha patel (@ameesha_patel) May 8, 2026
तसेच या पोस्टमध्ये अमिषा पटेलने पीआरविषयी टीका केली आहे. तिने लिहिले, “कहो ना प्यार है, गदर, किंवा गदर २… एक नायिका म्हणून मी एक नव्हे, तर तीन सर्वात मोठे सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, ज्यांना सर्वाधिक प्रेक्षक मिळाले आणि आजपर्यंत माझ्या सहकलाकारांसाठी सर्वात मोठे हिट चित्रपटही दिले आहेत. पण इतर अभिनेत्रींच्या तुलनेत माझी पीआर यंत्रणा कमकुवत आहे.”
तिने पुढे लिहिले, “एखादा स्टार तेव्हाच ग्लोबल सुपरस्टार बनतो, जेव्हा तो जगभरात एक प्रचंड हिट चित्रपट देतो. कोणत्याही अभिनेत्यासाठी जगात कुठेही कोणत्याही प्रोजेक्टचा भाग असणे ही नेहमीच एक छान भावना असते, पण तुम्ही ते मोठे हिट चित्रपट दिल्यानंतरच सुपरस्टार बनता. आता ही पीआर यंत्रणा चालवणे थांबवा!”
बॉक्स ऑफिसवर धमाका होणार! (Ameesha Patel)
‘गदर ३’ बाबत अमिषा पटेलने दावा केला आहे की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई करेल. तिने असेही म्हटले की हा चित्रपट पूर्वीपेक्षाही अधिक भव्य प्रमाणात बनवला जाईल. अमिषा पटेलच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की ‘तारा सिंग’ (सनी देओल) पुन्हा एकदा पाकिस्तानात धुमाकूळ घालण्यासाठी परत येत आहे. चाहते तारा सिंग आणि सकीना यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा : Health Tips: सकाळी उठताच पोटात गॅस होतोय? ‘हे’ सोपे उपाय देतील त्वरित आराम





