#VPIndia : उपराष्ट्रपती जगदीप धनखड 1 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर…
Updated On:

नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड, डॉ. सुदेश धनखड यांच्यासह एक सप्टेंबर 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी तयार केलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या राष्ट्रार्पण सोहळ्याला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A अंतर्गत निर्माण करण्यात आलेली सातवी युद्धनौका आहे असून, माझगाव डॉक लिमिटेडने ( MDL) बांधलेली ही चौथी युद्धनौका आहे.
आपल्या या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती माझगाव डॉक लिमिटेड च्या ‘धरोहर’ या वारसा वस्तुसंग्रहालयालाही भेट देणार आहेत.





