Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकारचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आज रविवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने गायन क्षेत्रातील सुमधुर आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जात होते. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
सोमवारी होणार अंत्यसंस्कार
आशाताईंचे उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा : Sanjay Raut : रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा मोठा बॅाम्ब! थेट म्हणाले “देवेंद्र फडणवीस…”





