ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ; ICUमध्ये उपचार सुरु
Updated On:

पुणे – प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी विक्रम गोखले यांना त्रास होऊ लागल्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांना लिव्हरचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.





