खूप भारी फिलिंग ! सिद्धार्थ जाधवला बक्षीस म्हणून मिळाली कार

Siddharth Jadhav | अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील मोठे यश संपादन केले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकणारा अभिनेता म्हणून सिद्धार्थची ओळख आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धू स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. यासाठी त्याला धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून कार बक्षीस मिळाली आहे. त्याबद्दल त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच त्याच्या अलिशान कारची झलक देखील दाखवली आहे.
सिद्धार्थ जाधव याने इंस्टाग्रामवर गाडीच्या पूजेचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आपलासिध्दू. न मागताच मिळाले आज खूप काही.. स्टार प्रवाह, श्री प्रसाद क्षिरसागर, सुमेध म्हात्रे, फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी आणि सतीश राजवाडे सर यांचा आभारी आहे. मराठी टेलिव्हीजनच्या इतिहासामधला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षांपूर्वी “इंडियन आयडॉल” च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती अन् ते बघून खूप आनंद झाला होता.” Siddharth Jadhav |
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला की, आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर “आता होऊ दे धिंगाणा” सारखा शो होस्ट करायला मिळणं, त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे. खूप मस्त वाटतंय. आता होऊ दे धिंगाणा..!” या व्हिडीओत त्याच्या घरातील मंडळी गाडीची पूजा करताना दिसत आहे. या पोस्टनंतर सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Siddharth Jadhav |
सिद्धार्थ जाधवच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘येरे येरे पैसा ३’मध्येही सिद्धार्थ पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:





