Ajit Pawar : अत्यंत भावुक क्षण! वहिनींची अवस्था पाहूण नणंद सरसावली; हात धरत सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंनी अंत्यविधीस्थळी आणलं
Ajit Pawar : अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जात आहे. दादांना निरोप देण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंसंस्कार सुरू आहेत. या मैदानावर मोठा जनसागर जमा झाला आहे. देशासह राज्याचे अनेक नेते अजित पवार यांच्या अत्यंविधीचे दर्शन घेण्यासाठी अत्यंविधीस्थळी दाखल झाले आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांपासून सगळेचजण मैदानावर ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणा देत आहेत. अत्यंत भावुक क्षण संबंध महाराष्ट्रासाठी आहे. बारामती शोकसागरात बुडाली आहे. पोरकेपणाची भावना बारामतीकरांसाठी आहे.
अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जात आहे. दादांना निरोप देण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे. ज्यावेळी सुनेत्रा पवार अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्या तेव्हा त्यांचे हात थरथरत होते. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मोठा कठीण क्षण त्यांच्यासाठी होता.
वहिनींची ही अवस्था पाहूण नणंद सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या. त्यांनी सुनेत्रा पवारांचा हात पकडून त्यांना स्टेजपर्यंत नेलं. यावेळी सुनेत्रा पवारांच्या सुनबाई ऋतुजा पवार देखील उपस्थित होत्या. या अत्यंत दुःखद क्षणाचा व्हिडीओ डोळ्यांत पाणी आणणारा आहे. तसेच हा क्षण संपूर्ण पवार कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आहे. पक्षातील नेत्यांनी देखील अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना अखेरचा निरोप दिला.
#WATCH | Baramati | NCP-SCP leader Supriya Sule consoles Sunetra Pawar, as the last rites of Maharashtra Deputy CM Ajit Pawar will begin shortly pic.twitter.com/zmYqgqirRT
— ANI (@ANI) January 29, 2026
विशेष म्हणजे शरद पवारांची स्वत:ची प्रकृती नाजूक आहे. ते रुग्णालयात उपचार घेत होते. पण अजित पवारांच्या अपघाताची बातमी कळताच काल दुपारी ते हेलिकॉप्टरने बारामतीला रवाना झाले. त्यांनी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.






