पुणे | तिघांकडून वाहनांची तोडफोड
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जनता वसाहतीत पहाटे साडेतीनच्या सुमारास तिघांच्या टोळक्याने दांडक्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये तीन रिक्षा, एक व्हॅन, एक कार आणि काही दुचाकींचा समावेश आहे. पर्वती पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले, की पहाटे साडेतीनच्या सुमारास जनता वसाहतीतील एका गल्लीमध्ये वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, वाहनांच्या काचा फोडल्याचे आढळून आले.
तपासाअंती ही तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असून, त्याच्यावर आधी एक गुन्हा दाखल होता. या टोळक्याची परिसरातील काही मुलांबरोबर वादावादी झाली. त्यानंतर त्यांनी तेथेच पडलेल्या दांडक्याने वाहनांची तोडफोड केली.





