BREAKING – पुणे | जनता वसाहतीतील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला; ‘दैनिक प्रभात’च्या पाठपुराव्याकडेही प्रशासनाचं दुर्लक्ष

Updated On:

पुणे – जनता वसाहत येथील सर्व्हे नंबर १०९ येथील चौकोनी टाकीचा 20 x 50 स्लॅब कोसळला. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही. ‘दैनिक प्रभात’ने या टाकीच्या दुरावस्थेबाबतचा विषय लावून धरत पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाने याकडेही दुर्लक्ष केलं.

या चौकोनी टाकीतून शहरातील सर्व पेठांना व शहराच्या मध्यवस्तीत पाणी पुरवठा केला जातो. या टाकीची एका बाजूची भिंत धोकादायकरित्या वाकली होती. या बाबत ‘दैनिक प्रभात’ने वारंवार पाठपुरावा केला होता. मंत्रालयापर्यंत प्रश्न पोहोचवला होता.

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी सदर टाकीचे काम टप्याटप्याने नवीन टेक्नॉलॉजीनुसार करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र पाच ते सहा महिन्यानंतरही येथे काम करण्यात आले नाही.

याउलट उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाने सदर जागा धोकादायक असून या परिसरात वावरू नये, अशा आशयाच्या पाट्या लावून आपली जबाबदारी झटकली होती. सदर बाब ‘दैनिक प्रभात’ने प्रकाशात आणली होती.

अखेर आज झालेल्या पावसात या टाकीचा अंदाजे 20×50 चा स्लॅब कोसळला. टाकीवर काही वेळा पूर्वीच लहान मुले खेळत होते. सुदैवाने अनर्थ टळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच तातडीने या टाकीचे काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

2026-10-03 10:04:18

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

Top-10 Sports News : आयपीएल मिनी ऑक्शन ते भारताच्या लेकींचा चीनमध्ये डंका; जाणून घ्या क्रीडा विश्वातील 10 मोठ्या घडामोडी!

2026-09-17 17:01:38

Top-10 Sports News : आयपीएल मिनी ऑक्शन ते भारताच्या लेकींचा चीनमध्ये डंका; जाणून घ्या क्रीडा विश्वातील 10 मोठ्या घडामोडी!

Ganeshotsav : ' दैनिक प्रभात’ कार्यालयात बाप्पा विराजमान; विधीवत प्राणप्रतिष्ठा, चैतन्यमय वातावरण

2026-09-15 08:55:34

Ganeshotsav : ' दैनिक प्रभात’ कार्यालयात बाप्पा विराजमान; विधीवत प्राणप्रतिष्ठा, चैतन्यमय वातावरण

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

2026-09-09 22:39:52

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

PMC Action: शाळेभोवती कचऱ्याचे ढिगारे; महापौरांच्या दणक्याने तासाभरात पालिका ॲक्शनमध्ये!

2026-09-09 21:11:24

PMC Action: शाळेभोवती कचऱ्याचे ढिगारे; महापौरांच्या दणक्याने तासाभरात पालिका ॲक्शनमध्ये!