‘भाई’ होण्यासाठी फोडली वाहने

भोसरी पोलिसांकडून सहा जणांना अटक
पिंपरी – ‘भाई’ होण्यासाठी एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करीत भोसरी परिसरात दहशत निर्माण केली. मात्र भोसरी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अभिषेक युवराज कांबळे उर्फ बच्चा (वय 20, रा. मोरया कॉलनी, भोसरी), अनिकेत श्रीधर कोपरे (वय 19, रा. धावडेवस्ती, भोसरी), अमोल कैलास ढेंगळे (वय 19, रा. वडगाव चौक, आळंदी), अक्षय राजेंद्र पवार (वय 19), सुरज नारायण शर्मा उर्फ डॅनी (वय 19), अमोल शांताराम नितोने (वय 20, सर्व रा. भगतवस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुहास दगडू शिंदे (वय 33, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 11) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सहा जणांनी मिळून फिर्यादी शिंदे यांना यांच्या राहत्या घराच्या सामोर अडविले. शिंदे यांच्या गळ्याला चाकू लाऊन शिवीगाळ करत शिंदे यांच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या आणि अन्य वाहनांची तोडफोड करून नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करायची आणि भाई होण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आवताडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, आशिष गोपी, आणि सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





