पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभाग शनिवारी (दि.६) (साप्ताहिक सुट्टी) आणि रविवारी (दि.७) अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस असल्याने बंद राहणार आहे. तर, फुल विभागही रविवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये. खरेदीदारांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. दरवर्षी अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला आणि फुल विभाग बंद असतो. त्याप्रमाणे रविवारी यंदाही बंद राहणार आहे. फळ, भाजीपाला विभागाला शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे फळ, भाजीपाला विभाग शनिवारीही बंद राहणार आहे. तर शनिवारी फुल बाजार मात्र सुरू राहणार आहे. गुळ-भुसार विभागाला रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे बंद राहणार आहे.