वीरनुष्का ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सोशली मीडियावर देखील क्रिकेटर विराट कोल्ही आणि अनुष्का शर्मा यांचे फॅन फॅालोविंग अधिक आहेत. या फॅन्सला वीरनुष्का त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगत असतात. नुकतीच ही जोडी अलिबागमध्ये दिसली. त्यांनी येथील नव्या घराला व्हिजीट देऊन ते मुंबईत परतले. यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी या त्यांच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाची तयार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अलिबागमधील त्यांच्या बंगल्याचे दृश्य दिसत आहे, ज्याला गृहप्रवेश करण्याच्या आधी फुलांनी सजवलेले दिसत आहे. २०२३ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आलिबागमध्ये एक आलिशान व्हिला घेतल्याचे समोर आले होते. या प्रॅापर्टीची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने भरलेली बोट आणि पूजेसाठी पुजारी जाताना दिसत होते. यावरुनच त्यांच्या चाहत्यांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम असल्याचा अंदाज लावला होता. २०१८ मध्ये दिग्दर्शक आनंद एल. राय याच्या झिरो सिनेमात अनुष्का शिवटची दिसली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कला सिनेमात तिने छोटा कॅमिओ केला होता. आता अनुष्का चकदा एक्सप्रेस या बायोपिक सिनेमात दिसणार आहे.