वेदांता – फॉक्सकॉनबाबत श्वेतपत्रिका सादर करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर कोणत्या परिस्थितीत गेला याबाबत महाराष्ट्र सरकार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर करेल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की सध्या आम्ही ही श्वेतपत्रिका तयार करण्याचे काम करीत आहोत.
17 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ही श्वेत पत्रिका मांडली जाईल, असे ते म्हणाले. फॉक्सकॉनने आपला निर्णय कोणत्या घटकांवर आधारित जाहीर केला याचा अभ्यास सध्या सुरू असल्याचे मंत्री म्हणाले.
माझ्या हातात कोणतीही योग्य माहिती असल्याशिवाय मी यावर भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आहे, पण तेथेही हा प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही. आता तर या संयुक्त प्रकल्पातून फॉक्सकॉनने वेदांत समुहापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे त्या प्रकल्पापुढील अडचणी वाढल्या आहेत.





