Pune District : रांजणगाव वसाहतीत हेलिपॅड तयार करा

रांजणगाव गणपती : पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन शासकीय हेलिपॅड तयार करण्यात यावे, अशी मागणी शिरूर- हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, विकास लवांडे यांसह तालुक्यातील विविध संस्थांचे, पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत हेलिपॅड उपलब्ध नाही. वेळोवेळी अनेक केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार रांजणगांव औद्योगिक वसाहतीमध्ये व तालुक्यामध्ये भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, हेलिपॅड उपलब्ध नसल्याने अनेकवेळा गैरसोय होत आहे.
तरी रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत कायमस्वरुपी सुसज्ज, असे शासकीय हेलिपॅड औद्योगिक वसाहतीच्या मालकीच्या जागेमध्ये तयार करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.





